Tarun Bharat

सोलापुर ग्रामीणमध्ये आज ७ कोरोना पॉझिटीव्ह

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर

शुक्रवारी ग्रामीण व नागरी भागात ७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी, १२ जुन रोजी ५४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७ पॉझिटीव्ह तर ४७ अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये ६ पुरुष आणि एका स्त्री चा समावेश आहे. बाधित रुग्ण सुमित्रा नगर, अकलूज, तालुका माळशिरस, पारधी वस्ती, मुळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, वळसंग, ता. दक्षिण सोलापूर, मौलाली गल्ली, अक्कलकोट, नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर आणि मध्ये सोहाळे, ता. मोहोळ येथील असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या १०३ इतकी झाली आहे.

Related Stories

कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक

Patil_p

एकही चेंडू न खेळता भारत अंतिम फेरीत

tarunbharat

न्यायवृंदाकडून 9 न्यायाधीशांच्या नावांची सूचना

Patil_p

ऍक्सेलसेन, युफेई यांना विजेतेपद

Patil_p

आयटीसीकडून 10 लाख एकरच्या ‘वॉटरशेड’साठी करार

Patil_p

भारताच्या आयटी नियमांवर आता ‘युएन’चा आक्षेप

Patil_p
error: Content is protected !!