Tarun Bharat

सोलापुरातील संविधान भवन उभारण्यासाठी लक्ष देणार : सुशीलकुमार शिंदे

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूरमध्ये संविधान भवन उभारण्यासाठी लक्ष देणार, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केले.

शहरातील नॉर्थकोट मैदान येथे संविधान भवन उभारण्यासाठी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी महापालिकेला निवेदन व प्रस्ताव दिला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून संविधान भवनसाठी जागा आवश्यक असल्याचे कळवले आहे. त्यामुळे प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेने नॉर्थकोट प्रशाला येथील जागा संविधान भवनसाठी मिळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जागा भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू

संविधान भवनसाठी नॉर्थकोट प्रशाला येथील रिकामी जागा मिळण्यासाठी संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. जागा भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. संविधान भवन उभारल्यास सोलापूर शहर-जिल्ह्यातील व राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण-संशोधन करण्यासाठी उपयोग होईल.

-सचिन शिंदे, संस्थापक अध्यक्ष, प्रयास मागासगर्वी

Related Stories

तेजस्वी सातपुतेंची खंडपीठापुढे होणार चौकशी

Patil_p

‘हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात पोलिसांना नको ती कामं करावी लागताहेत’

Archana Banage

सोलापूर : एमआयएमतर्फे कोकणच्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची गाडी रवाना

Archana Banage

बकरी ईद साधेपणाने साजरी करा : अजित पवार

Tousif Mujawar

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage

कोल्हापूर : आनंदा खोत यांचे ग्रामपंचायत सदस्यपद कायम

Archana Banage