तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बोरगाव दे
आज, शनिवारी अक्कलकोटमध्ये सहा पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. सकाळी या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात दोन व्यक्ती सलगर मध्ये, तर, समर्थ नगर, बुधवार पेठ, इंदिरानगर झोपडपट्टी, आझाद नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
तालुक्यातील लोक विशेष काळजी घेताना दिसत नाही. संसर्ग आटोक्यात आणण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्या सोबत नागरिकांची आहे. सोशल डिस्टन्स पाळावे मास्कचा वापर करावा,अनावश्यक बाहेर फिरु नये असे आवाहन व्हिडिओ संदेश द्वारे तहसीलदार मरोड यांनी केले आहे.

