Tarun Bharat

सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची नियंत्रण कक्ष कर्तव्यार्थ पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अचानक झालेल्या बदलामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तर आता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यास नूतन पोलीस निरीक्षक म्हणून अनंत महिपतराव कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची २५ एप्रिल २०२१ रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर तात्काळ बदली करण्यात आली आहे.दि १७ रोजी आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची संक्षिप्त चौकशीत निष्पन्न झालेल्या कसुरीच्या अनुषंगाने पंढरपूर मंदिर सुरक्षा येथे कर्तव्यार्थ नेमणूक करण्यात आली आहे. सोलापूर नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अनंत महिपतराव कुलकर्णी यांची प्रभारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.

याच बरोबर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड यांची बदली मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अक्कलकोट तालुक्यातील अवैध धंदे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी कितपत यशस्वी होतील हा येणारा काळच ठरवणार आहे.

Related Stories

Shivaji University : अधिसभा शिक्षक संघात 2 जागा बिनविरोध

Kalyani Amanagi

कृषी विधेयकाच्या विरोधात माकपचे मौन धरणे आंदोलन

Archana Banage

सोलापूर : संचारबंदीत मराठा आंदोलकांनी घेतले नामदेव पायरीचे दर्शन

Archana Banage

येडोळा येथे रिपाइं (आठवले)सह ग्रामस्थांच्या वतीने बोरीनदीत जलसमाधी आंदोलन

Archana Banage

सोलापूर शहरात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

Archana Banage

पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : अरण्यऋषी चितमपल्ली

Archana Banage