Tarun Bharat

सोलापूर : आई तुळजाभवानी मातेची धन्वंतरी रूपात विशेष पूजा

Advertisements

कोरोनाच्या संकटातून रक्षणासाठी हळदी कुंकाचा मातेच्या मस्तकी डॉक्टरांचा लोगो काढून प्रार्थना

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / तुळजापूर

श्री तुळजाभवानी मातीच्या नित्य पूजेनंतर मस्तकी मळवट भरून त्यावर आज डॉक्टरांचे चिन्ह असणारा लोगो आकर्षक हळदी कुंकवात काढून जगावर आलेल्या कोरोना संकटातून सर्वांचे रक्षण कर म्हणून विशेष धन्वंतरी महापूजा करण्यात आली सध्या सर्वत्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक नियम अटी लागू करून दिल्या आहेत त्याचे काटेकोर पालन होत आहे गर्दी टाळण्यासाठी भाविकांना दर्शन बंद केले आहे पण मंदिर प्रशासनाच्यावतीने ऑनलाईन दर्शन व्यवस्था केली आहे आणि मंदिर संस्थानच्या वतीने सर्व भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे.

जगावर आलेल्या संकटातून निवारण करण्यासाठी अभिषेक पूजेनंतर रोज दोन वेळेस म्हणजे सकाळी चरण तीर्थ नंतर आणि संध्याकाळी घाट झाल्यानंतर आई तुळजा भवानीचा मळवट भरून त्यावर कुंकवाने स्वास्तिक कमळ त्रिशूल सूर्य शंक मोर ओम अशा प्रकारे धार्मिक चिन्हासह आकर्षक चिन्ह मंहत आणि पुजारी रोज काढतात पण आज मात्र धन्वंतरी रूपात विशेष पूजा करण्यात आली देवीच्या मस्तकी कपाळावर डॉक्टरांचा लोगो असणारे बोधचिन्ह हळदी-कुंकवाचा काढण्यात आले आणि देवीला डॉक्टर रूपात पूजा करून कोरोना पासून सर्वांचे रक्षण कर म्हणून प्रार्थना करण्यात आली.

Related Stories

होम आयोलेशनमधील रुग्ण घराबाहेर दिसला की होणार कारवाई

Patil_p

महापूर पट्ट्यातील पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा- राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

एक दिवस शाळेसाठी उपक्रम

Patil_p

Solapur : पिकपच्या धडकेत एकाचा मृत्यू; अक्कलकोट स्टेशन येथील घटना

Abhijeet Khandekar

चिंतन शिबिरात राहुल गांधी यांची देशव्यापी यात्रेची घोषणा

Abhijeet Khandekar

वेळेचा सदुपयोग करत सुर्याचीवाडी येथील जाधव कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

Archana Banage
error: Content is protected !!