Tarun Bharat

सोलापूर :”आयुक्त साहेब मयत समर्थ भास्करच्या कुटुंबियांना न्याय द्या”

न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण व विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी / सोलापूर

मयत समर्थ धोंडीबा भास्करच्या कुटुंबियांना तातडीने स्मार्ट सिटी योजनेतून ५० लाख रुपये आर्थिक मदत करा व समर्थ भास्करच्या मृत्यूस कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी रास्त, नागरी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने करण्यासाठी सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे तरुण व विद्यार्थी शिष्टमंडळाद्वारे निवेदन घेऊन येताच पोलिसांनी बळाचा वापर करून निदर्शन करण्यास मज्जाव केला आणि अटक सत्र सुरु केले. यावेळी युवा आघाडीचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केले.

सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने सोलापूर महानगर पालिका मा. आयुक्त कार्यालय येथे स्मार्टसिटी च्या ढिसाळ कारभारामुळे दगावलेल्या मयत समर्थ भास्कर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावे या मागणीसाठी युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले.

यावेळी युवा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, शाम आडम, दत्ता चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने मा. आयुक्त पी.शिवशंकर यांना निवेदन देऊन या प्रकरणी सविस्तर चर्चा केले. संबंधित प्रकरणी कारणीभूत असणारे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून तातडीने करावी करावी व मयताच्या कुटुंबियांना ५० लाख आर्थिक मदत तातडीने अदा करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला. यावेळी कादर शेख, राहुल बुगले, तौसीद कोरबू, रोहित सावळगी, इलियास सिद्धिकी आदींसह शेकडो तरुण व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

मदिरालयाचे नव्हे तर मंदीराची दारे ठाकरे सरकारने उघडावीत

Archana Banage

सोलापुरात आज 5 कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Archana Banage

जीवे मारण्याची धमकी देत ऐवज लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Archana Banage

करमाळ्यात मुख्याध्यापकाची आत्महत्या

datta jadhav

सोलापूर : तिसर्‍या पिढीनेही कायम ठेवली इको फ्रेंडली बाप्पा बनवण्याची परंपरा

Archana Banage

सोलापूर : लऊळ नजीक कार अपघात, दोघे गंभीर जखमी

Archana Banage
error: Content is protected !!