Tarun Bharat

सोलापूर : एमआयएमचे शहराध्यक्षांकडून १० हजार घरांना अन्नधान्याचे किट वाटप

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर  शहर आणि जिल्ह्यात  लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे गोरगरिब आणि मजुरांचे प्रचंड  होत आहेत. हे ओळखून सामाजिक बांधलकी म्हणून एआयएमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यावतीने सोलापुर, अक्कलकोट, पंढरपुर, मोहोळ, मैंदर्गी तसेच बोरगांव, मातनहळ्ळी, नागनहळ्ळी, सातनदुधनी, वळसंग, डोबंरजवळगा, दूधनी, हसापुर, रामपुर, करजगी अनेक गावामध्ये अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. शहर आणि जिल्ह्यात मिळून सुमारे १० हजार किटचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

कुणाचीही उपासमार होऊ नये म्हणून अन्नधान्य वाटप

जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत धान्याचे वाटप सुरूच राहणार. सध्या लॉकडाऊनचा काळ आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे गरिबांची उपासमार होत आहे. अशातच आता रमजानचा पवित्र सणही आला आहे. त्यामुळे या काळात कोणाचीही उपासमार होऊ नये म्हणून आणि आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून हिंदू आणि मुस्लिम बांधवांसाठी धान्य वाटप करुन समाजाचे ऋण फेडावे म्हणून हा छोटासा प्रयत्न असल्याचे फारुख शाब्दी यांनी सांगितले.

फारुख शाब्दी, एमआयएम शहर, जिल्हाध्यक्ष

Related Stories

सशक्त युवा, सशक्त भारताकरीता पाचवी युवा संसद पुण्यात

prashant_c

तलवार घेऊन नाचणे पडले महागात, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Archana Banage

सोलापूर : निलंगा तालुक्यात सापडले दोन अनोळखी मृतदेह

Archana Banage

करमाळा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मंजुरी

Archana Banage

लोकनेते साखर कारखाना येथे बायोगॅस टाकी कोसळून दोघांचा मृत्यू

Archana Banage

लवकरच लवकरच ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी उडणार

Archana Banage