Tarun Bharat

सोलापूर : कडब्याच्या गंजी खाली २२ नागाची पिल्ले

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी

माढा तालुक्यातील कुर्डूमध्ये भीमराव राऊत यांच्या घरासमोर कडब्याच्या गंजी खाली तब्बल २२ नागांची पिल्ले आढळली. ही नागाची पिल्ली सर्पमित्राच्या सहाय्याने पकडण्यात आलीत. मात्र नागाची ही पिल्ली पाहता राऊत कुटुंबीयाची एकच ताराबंळ उडाली.

कुर्डू येथील राऊत यांच्या घरासमोर कडब्याची गंज लावली होती. या कडब्याच्या खाली असलेल्या फळीखाली नाग असल्याचे राऊत यांच्या लक्षात येताच राऊत यांनी कुर्डुवाडी येथील सर्पमित्र राहूल अस्वरे यांना फोन केला. क्षणाचाही विलंब नकरता राहूल अस्वरे व त्याचे सहकारी सुमित मस्के कुर्डू येथे पोहचले. त्यावेळी ८ ते ९ नागाची पिल्ले बाहेर आली होती. यावेळी अस्वरे यांनी या नागाच्या पिलांना पकडले व गंज काढून फळी खाली सुमारे अडीच फूट खड्डा खांदून नागाच्या पिलांचा माग काढला असता आणखी पिल्ले सापडली एकूण २२ पिल्ले या सर्प मित्राने पकडली. सुमारे एक महिन्याची ही पिल्ले असून हे कोब्रा जातीचे नाग असल्याचे सर्पमित्र राहूल राऊत यांनी सांगितले. या पिल्लांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Stories

फडणवीसांच्या मागे ‘उप’ हा शब्द लावायला फार जड जातंय- संजय राऊत

Archana Banage

टोलनाक्यावर फास्टॅगची रिटर्न लूट

prashant_c

बार्शी तालुक्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू ; नवीन तीन रुग्णांची भर

Archana Banage

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची आजपासून राष्ट्रीय कार्यशाळा

datta jadhav

Solapur; बोरगाव परिसरात मुसळधार पाऊस; सततच्या पावसाने बळीराजा हतबल

Abhijeet Khandekar

लालबागमधल्या इमारतीला लागलेली आग नियंत्रणात; आयुक्तांनी व्यक्त केली चिंता

Archana Banage