Tarun Bharat

सोलापूर : करमाळा शहरातील व्यापारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

प्रतिनिधी / करमाळा

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेशानुसार करमाळा शहरांतील व्यापारी यांची कोरोना चाचनी दिनांक १एप्रिल ते ५ एप्रिल या काळात जूनी नगरपालिका इमारत पुणे रोड येथे सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे.

सदर चाचणी केलेनंतर त्याचा चाचणी अहवाल देण्यात येणार असून तो अहवाल दुकानाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.तरी शहरातील सर्व व्यापारी ,फळे विक्रेते, भाजी विक्रेते ,फेरीवाले’, टपरीधारक, सलून धारक ,ब्युटी पार्लर धारक,यांनी कारोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसिलदार समीर माने, मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे.

याचबरोबर करमाळा शहरातील सर्व कार्यालयातील,पोलीस,बँक,नगरपरिषद,पंचायत समिती ,पोस्ट,कृषिउत्पन्न बाजार समिती,वीज वितरण ,सर्व शाळा व कॅालेज कर्मचारी यांनी देखील कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. कोरोना चा वाढता संसर्ग रोकणे कामी कोरोणा चाचणी करणे व बाधित रूग्णास लवकरात लवाकर उपचार देणे याकरीता सदर कोरोणा चाचणी शिबीर आयोजीत करण्यात आले असल्याचे सांगितले.

Related Stories

एक जानेवारी पासून सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य

Archana Banage

शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करणार – जिल्हाधिकारी

Archana Banage

दर्शन घेऊन परतत असताना रेल्वेच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू

Abhijeet Khandekar

वाळू तस्करावर कारवाई, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पद्दोनतीवर बदली, दत्तात्रय कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

Archana Banage

सोलापूर : निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा

Archana Banage