Tarun Bharat

सोलापूर : कवठेकर प्रशालेच्या सावनी दोशीला दहावीला १०० टक्के गुण

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर

येथील कवठेकर प्रशालेची सावनी तारकेश्वर दोशी या विद्यार्थीनीला क्रिडांगुणांसह 100 टक्के गुण दहावीला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सदरची विद्यार्थीनी राज्यात प्रथम आली आहे. तर पंढरपूर तालुक्याचा 97.56 टक्के निकाल लागला आहे. तर तालुक्याती तब्बल 38 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

दहावीचा निकाल बुधवारी दुपारी दोन वाजता जाहीर झाला. यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 103 शाळांचा निकाल देखिल घोषित झाला. यामधे पंढरपूर शहर आणि तालुक्यांचा सरासरी निकाल हा 97.56 टक्के इतका लागला. तर तालुक्यातील तब्बल 38 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला.

यामध्ये विशेष म्हणजे शहरातील कवठेकर प्रशालेतील विद्यार्थीनी सावनी तारकेश्वर दोशी या विद्यार्थीनीला 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सदरच्या विद्यार्थ्यानीस क्रिडा विषयांचे दहा गुण अधिक मिळाले. त्यामुळे या विद्यार्थीनीचे एकंदर गुणांकन हे 100 टक्के झाले. आणि ही राज्यात सर्वपथम आली आहे. तर कवठेकर प्रशालेचा निकाल हा 96.66 टक्के इतका लागता.

याशिवाय शहरातील नामांकित असणा-या द.ह.कवठेकर प्रशालेचा निकाल हा तब्बल 99.30 टक्के इतका लागला. तर आपटे उपलक प्रशालेचा 96.42 टक्के, विवेक वर्धिनी विद्यालय 97.45 टक्के, लोकमान्य विद्यालय 93.22 , मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला 97.77 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणीचा 99.06 टक्के तर यशवंत विद्यालयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यांच्या एकंदर निकालांमध्ये देखिल मुलींनीच बाजी मारली असल्यांचे चित्र आहे. तालुक्यातून 7064 विद्यार्थ्यानी दहावीची परिक्षा दिली होती. यामधून 6892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल 2776 विद्यार्थी हे 75 टक्के हून अधिक गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

Related Stories

सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं …

Abhijeet Shinde

अलिबाग कारागृहातून कैद्यांचे पलायन; एक ताब्यात, दुसरा फरार

Abhijeet Shinde

“राज्यांमध्ये लस साठा असताना लसीकरण कमी का”

Abhijeet Shinde

पंजाब मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २५ हजार पदांना मंजुरी

Sumit Tambekar

सोलापूर : प्राण्यांचे बाजार भरविणे शर्यती लावण्यास जिल्ह्यात मनाई

Abhijeet Shinde

आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळच असतं – मंत्री यशोमती ठाकूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!