Tarun Bharat

सोलापूर : किणीमोड येथील दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

प्रतिनिधी / अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने अवैध धंद्यावर छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन मोठ्या प्रमाणात सापडून आले आहे. ही कारवाई दि ४ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने किणीमोड तांड्यावर विनापरवाना हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन प्लास्टिक पिंपात भरलेले व भट्टीचे साहित्य आढळून आले असून त्याची अंदाजे किंमत ५५, ५९० रुपये आहे. सदर अवैध व्यवसाय राजू गोपु चव्हाण रा किणीमोड तांडा ता. अक्कलकोट याचे असून तो फरार आहे. या गुन्ह्याची फिर्याद पो. कॉ. गजानन गायकवाड यांनी दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहे.

Related Stories

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Tousif Mujawar

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ४ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Archana Banage

ट्रॅक्टर चालकाच्या मारहाणीत ऊस तोड मजूराचा मृत्यू

Archana Banage

Kolhapur breking : खंडणीसाठी पती-पत्नीला मारहाण; बोन्द्रेनगर परिसरात हद्दपार गुंडाची दहशत

Abhijeet Khandekar

मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त एक असा ही आदर्श उपक्रम

Archana Banage

बार्शीचे जवान वाघ कारगिल मध्ये शहीद

Archana Banage