Tarun Bharat

सोलापूर : कुर्डुवाडीत वृद्ध दाम्पत्याची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

Advertisements

तरुण भारत संवाद

कुर्डुवाडी/प्रतिनिधी

येथील वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पती नवनाथ भगवान कदम (वय ७५) व पत्नी सुशीला (वय ६५) अशी या वृध्द दाम्पत्याची नावे आहेत. आंतरभारती विद्यालयाजवळील वसाहतीमध्ये काल, सोमवारी (दि.27) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत तानाजी नवनाथ कदम यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ कदम हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील निवृत्त कर्मचारी होते. निवृत्त होऊन त्यांना १७ वर्षे झाली. आंतरभारती परिसरात एका दुमजली घरात ते मुलासह राहत होते. कदम यांना तीन मुले असून दोन शिक्षक व एक व्यावसायिक आहे. सर्व काही सुस्थितीत असताना पत्नी सुशीला यांनी वरच्या मजल्यावर किचनमध्ये तर पती नवनाथ यांनी बेडरूममध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या या आत्महत्येनंतर जीवनाच्या उत्तरार्धात अशा प्रकारे एकत्रित आत्महत्या करावी लागत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही अशी चर्चा शहरात सुरु होती.

Related Stories

सोलापूर : अपहरण झालेल्या दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत

Abhijeet Shinde

करमाळा तालुक्यासाठी 5 कोटी निधी मंजूर

Sumit Tambekar

सोलापूर : ‘वैरागच्या डॉक्टरांचे कोविड हॉस्पिटल उभारणी कार्य कौतुकास्पद’

Abhijeet Shinde

आव्हानात्मक ठरणार रेल्वे प्रवास आणि गर्दीचे नियोजन

Abhijeet Shinde

‘एसटी महामंडळास 2 हजार कोटी आर्थिक सहाय्य करावे’

Abhijeet Shinde

सोलापूर: कंटेनरच्या धडकेत तुंगतच्या दोन युवकांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!