Tarun Bharat

सोलापूर : कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात ऑक्सीजन युक्त कोविड सेंटर उभारणार

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

कोरोनाच्या पुढील संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था बळकट करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी माढा व कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला मोठा आर्थिक खर्च सोसावा लागला. त्यादृष्टीने पुढे येणारी करोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांची असण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर माढा येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटीव्ह प्लँट उभारणार तर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करुन उपलब्ध बेड ऑक्सिजनयुक्त करण्यासाठी सेंट्रल लाईन टाकणार आहोत. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे डॉ. ढेले यांनी सांगितले.

तसेच कुर्डुवाडी येथील रेल्वे हॉस्पीटलही सर्व सुविधांनी सज्ज करण्यासाठी व इतर रुग्णांनाही याठिकाणी उपचार मिळावे यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुर्डूवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन सुविधा बाबतची माहिती घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, आरोग्य अधिकारी डॉ. सुनंदा रणदिवे, डॉ. प्रसन्न शहा, डॉ. पंकज सातव उपस्थित होते.

Related Stories

उस्मानाबाद : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी घेतली कोरोनाची लस

Archana Banage

मराठा समाजबांधव संतापले

Archana Banage

आदिनाथ साखर कारखान्याची निवडणुक लढवणार : आमदार संजय शिंदे

Abhijeet Khandekar

किरकोळ वादातुन पानगावात हाणामारी, बार्शी पोलीसात गुन्हा दाखल

Archana Banage

सोलापूर : प्रार्थना स्थळे उघडण्यासाठी बार्शीत भाजपचे घंटानाद आंदोलन

Archana Banage

तलवार घेऊन नाचणे पडले महागात, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Archana Banage
error: Content is protected !!