Tarun Bharat

सोलापूर : कुर्डुवाडी येथे एकाचवेळी सरणावर ७ जणांचा अंत्यविधी

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होताना पहायला मिळत आहे. रोज नवे रुग्ण वाढत आहेत. आज कुर्डुवाडी शहरातील विविध हॉस्पीटलमधून ७ जण दगावले. येथील हिंदू स्मशानभूमीत एकाचवेळी ७ जणांचा अंत्यविधी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा हृदयद्रावक प्रसंग सर्वांचेच मन हेलावून टाकणारा होता. हा अंत्यविधी बालाजी कोळेकर यांच्या सहकार्यांनी पीपीई किट घालून केला.
कोविडमुळे या सर्वांचे मृतदेह कापडामध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आला. मृतांच्या केवळ पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांमध्ये शहरातील दोन व परिसरातील पाच व्यक्तींचा समावेश होता. या प्रसंगाला आपण सर्वजण कारणीभूत आहोत. प्रशासन वारंवार आपल्याला विविध माध्यमातून काळजी घ्या असे वारंवार सांगत आहे. मात्र आपण सुजाण नागरिक त्याकडे कानाडोळा करुन नाहक समाजाला वेठीस धरण्याचे काम करत आहोत.

आपण स्वतः बरोबर इतरांच्या दुःखास कारणीभूत ठरत आहोत. आपण जर इतरांचे दुःख कमी करण्यास असमर्थ असलो तर ते वाढवण्यासाठी आपली समर्थता दाखवू नये. शहरातील कोविड हॉस्पीटल मध्येबेड शिल्लक नाहीत. प्रशासन इतर खासगी हॉस्पीटल ताब्यात घेऊन तिथे कोविड हॉस्पीटल साठी प्रयत्नशील आहे.आता तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. तरच होणारा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो. अनेकजण नियमावलीमधून पळवाटा काढून दुकाने उघडी ठेवत आहेत. या पैसे कमवायच्या आसुरी महत्वकांक्षेमुळे सर्वांचेच जीव धोक्यात येत आहेत. हे सर्व व्यापाऱ्यांनी लक्षात घ्यावे व निर्बंध पाळून शासनाला पर्यायाने कुर्डुवाडी प्रशासनालाही सहकार्य करावे अशी वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया समाजमाध्यमावर वाचायला मिळत आहेत.

आज येथील स्मशानभूमीतील विदारक व मन हेलावून टाकणारी परिस्थिती पाहूनही आपण जर निर्बंध पाळणार नसाल तर यापेक्षाही भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. किड्यामुंग्यांसारखी चालताबोलता माणसे मेलेली बघावी लागतील अशा प्रतिक्रिया ही नागरिकांतून उमटत आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोविड टेस्ट करुन घ्याव्यात.अत्यावश्यक वगळता इतर दुकाने चालू दिसल्यास प्रथम दंड दुसऱ्यावेळी दुकाने सील केली जातील. तरी नागरिक आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी केले.

Related Stories

सोलापूर : वासरावर बिबट्यानेच हल्ला केल्याची वन अधिकाऱ्यांची माहिती

Archana Banage

माढा : भोसरेत तीघांना कोरोनाची लागण

Archana Banage

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

श्रीस्वामी समर्थ अन्नछत्राचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक : ना. नितीन गडकरी

Archana Banage

 रेल्वेच्या आज 500 हून अधिक गाडय़ा रद्द

prashant_c

सोलापूर : कुर्डुवाडीतील के .एन. भिसे महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

Archana Banage