Tarun Bharat

सोलापूर : केम येथे ९५ हजाराचा गांजा जप्त, एकास अटक

प्रतिनिधी / करमाळा

करमाळा तालुक्यातील केम येथे आज पोलीसांनी गांजा विक्रीच्या रोख रकमेसह इतर गांजा ९५ हजार ९४० रूपयाचा जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी केली आहे.

यात केम येथे दुपारी पावणेतीन वाजता छापा टाकला असता तेथे गांजा सापडला असून तो एकूण ४ किलो ९९१ ग्रॅम आहे. त्यांची किंमत एकूण ४९ हजार ४१० रूपये, दूसऱ्या एका पिशवीत १ किलो १५५ ग्रॅम गांजा सापडला. तर तिसऱ्या बॉक्स मध्ये ४५८ ग्रॅम गांजा सापडला तर १३ हजार १५० रूपये रोख सापडले. अशाप्रकारे ९५ हजार ४९० रूपयाचा ८ किलो १५४ वजानाचा गांजा व १३ हजार १५० रू. रोख असा ऐवज सापडला आहे. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अरूण जनार्दन तळेकर (वय-६५) तळेकर वस्ती केम यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये 366 रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा – माजी आमदार म्हेत्रे

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये ४५४ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

राज्यातील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यावर

Archana Banage

दिल्लीतील शेतकरी आंदोलन पाठिंब्यासाठी बार्शीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Archana Banage

सोलापूर शहरात नवे 45 पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!