डीवायएफआयचे जिल्हा सचिव अनिल वासम यांची मागणी
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यातील खासगी वित्तीय संस्था व फायनान्स बचत गटाच्या वसुलदाराची सक्ती, दादागिरी रोखा अशा मागणीचे निवेदन डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना बुधवारी दिले.
वासम, बोलताना म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले त्यामुळे बचत गट, खाजगी वित्तीय संस्था, बँका आणि फायनान्सचे कर्जाचे हप्ते थकीत राहिले या थकीत हप्त्यांची वसुली संबंधित वित्तीय संस्था कडून सक्तीने वसूल करण्यासाठी धमकी देणे,दादागिरी करणे,शारीरिक व मानसिक त्रास देणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे,अंगावर धावून येणे असे प्रकार सर्रासपणे चालू आहे.
यांच्या विरुद्ध डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे.कर्जदारांना मुदतवाढ द्यावी सक्तीची वसुली व दादागिरी रोखा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.