प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी 15 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 11 पुरुष, 4 स्त्रियांचा समावेश आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 416 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 219 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी गुरुवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण खडकपुरा करमाळा 1, समर्थ नगर अक्कलकोट एक, विजयनगर अक्कलकोट एक, करजगी तालुका अक्कलकोट एक, भवानी पेठ बार्शी एक, आदर्श नगर नागणे प्लॉट बार्शी एक वैराग तालुका बार्शी एक, वाळूज तालुका मोहोळ एक, होडगी तालुका दक्षिण सोलापूर एक , हत्तुर तालुका दक्षिण सोलापूर एक, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर एक, सब जेल तहसील ऑफिस बार्शी एक ,वैराग तालुका बार्शी दोन, जिंती तालुका करमाळा एक या क्षेत्रात रुग्णआढळले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 204 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 189 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 15 पॉझिटिव्ह आढळल्या आहेत . 416 रुग्णांपैकी 260 पुरुष 156 स्त्री आहेत. तालुक्यात आज एक तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज 24 तर एकूण 178 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 79
बार्शी – 57
माढा- 8
माळशिरस – 5
मोहोळ- 24
उत्तर सोलापूर – 45
करमाळा- 3
सांगोला – 3
पंढरपूर 21
दक्षिण सोलापूर – 171
एकूण – 416
होम क्वांरटाईन – 1773
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 4238
प्राप्त अहवाल- 4206
प्रलंबित अहवाल- 32
एकूण निगेटिव्ह – 3791
कोरोनाबाधितांची संख्या- 416
रुग्णालयात दाखल – 219
आतापर्यंत बरे – 178
मृत – 19


previous post