Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर

तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी 30 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 17 पुरुष, 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा मृत्यू तर आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 587कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 319 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी मंगळवारी दिली.

आजचे कोरोनाबाधित रुग्ण कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर दोन, तालुका कारमंबा उत्तर सोलापूर एक, मंगळवार पेठ बार्शी एक, बार्शी एक, साकत पिंपरी तालुका बार्शी दोन ,वैराग तालुका बार्शी एक, खवणी तालुका मोहोळ एक, फतेसिंह चौक अक्कलकोट 7, जंगी प्लॉट अक्कलकोट पाच ,बुधवार पेठ अक्कलकोट एक, चपळगाव तालुका अक्कलकोट एक तालुका अक्कलकोट एक, बोरगाव तालुका अक्कलकोट एक, गोविंदपुरा पंढरपूर एक, जुनी कोळी गल्ली पंढरपूर एक, गुरसाळे तालुका पंढरपूर 1, भोसरी तालुका माढा एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 270 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 240 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 30 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 587 रुग्णांपैकी 375 पुरुष 212 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 241 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट 116, मंगळवेढा 1बार्शी 110, माढा 12
माळशिरस 6, मोहोळ 29,
उत्तर सोलापूर – 61, करमाळा 6
सांगोला 4, पंढरपूर32
दक्षिण सोलापूर – 210
एकूण 587

होम क्वांरटाईन – 1778
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 5074प्राप्त अहवाल- 5010
प्रलंबित अहवाल- 64
एकूण निगेटिव्ह – 4424

कोरोनाबाधितांची संख्या- 587
रुग्णालयात दाखल – 319
आतापर्यंत बरे – 241
मृत – 27

Related Stories

सोलापुरात पावसाळा संपत आल्यानंतर कामगारांसाठी ‘रेनकोट’ वाटप

Archana Banage

सोलापूर : शेतकरी विरोधी विधेयकांची स्वाभिमानीकडून होळी

Archana Banage

पुण्याचा अभिजीत कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी

datta jadhav

नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांची हत्या केली

datta jadhav

शेतकऱयांना केंद्राकडून मिळणारी वागणूक अयोग्य

Patil_p

माजी महापौर विठ्ठल जाधव विरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे

Abhijeet Khandekar