प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 237 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज गुरुवारी 177 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून या पैकी 106 पुरुष, 71 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 862 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 29 हजार 425 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1641जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1464 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 177 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 862 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 25 हजार 451 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1069
मंगळवेढा- 1359
बार्शी – 5252
माढा- 3005
माळशिरस – 5103
मोहोळ- 1358
उत्तर सोलापूर – 717
करमाळा- 2006
सांगोला – 2351
पंढरपूर 5809
दक्षिण सोलापूर – 1396
एकूण – 29, 425
होम क्वांरटाईन – 4140
एकूण तपासणी व्यक्ती- 227339
प्राप्त अहवाल- 227392
प्रलंबित अहवाल- 47
एकूण निगेटिव्ह – 197968
कोरोनाबाधितांची संख्या- 29,425
रुग्णालयात दाखल – 3112
आतापर्यंत बरे – 25,451
मृत – 862


previous post