Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये २१६ पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव
बरे झाल्याने ४३४ रुग्णांना सोडले घरी

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी २१६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल ४३४ रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी २१२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १९११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. २१६ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये १४१ पुरुष आणि ७५ स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७३९२ झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती २०५४८४
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : २७३९२
प्राप्त तपासणी अहवाल : २०५६१५
प्रलंबित तपासणी अहवाल : ६९
निगेटिव्ह अहवाल : १७८२२२
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : ७५०
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : ४६९८
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : २१९५५

तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
अक्कलकोट १०४६, बार्शी ५०१२, करमाळा १९७९, माढा २८१८, माळशिरस ४६१९, मंगळवेढा १२७५, मोहोळ ११७८, उत्तर सोलापूर ७०३, पंढरपूर ५३७१, सांगोला २१०९, दक्षिण सोलापूर १२८३ आणि एकुण २७३९३

Related Stories

सोलापूर : किणीमोड येथील दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Archana Banage

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पाठवा – मुख्यमंत्री

Archana Banage

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; चार ठार, १९ जखमी

Abhijeet Khandekar

अकलूज, कुंभारी, बार्शीतील तीन दवाखाने कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

Archana Banage

सोलापूर : कडब्याच्या गंजी खाली २२ नागाची पिल्ले

Archana Banage

सोलापूर : विठ्ठल मंदिर, तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद; मंदिर समितीने घेतला निर्णय

Archana Banage