Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये ३४२, तर शहरात ४४ जण कोरोनाबाधित

जिल्ह्यात सात जणांचा बळी
शहरातील मृत्यूच्या प्रमाणात घट, 299 जणांना डिस्चार्ज

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

ग्रामीण भागामध्ये रविवारी 342, तर शहरात 44 रुग्ण आढळून आले. शहरातील मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असताना मात्र ग्रामीणमध्ये मृत्यूचे तांडव सुरुच आहे. आज सात जणांचा बळी गेला आहे. 299 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

ग्रामीण भागात बरे होऊन 190 रुग्ण घरी परतले, तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 213 वर पोहोचल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. 3 हजार 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 342 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 666 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात 211 पुरुष आणि 131 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 11 हजार 213 झाली आहे.

शहरात उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 109 जणांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 1 हजार 87 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 1 हजार 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 44 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 31 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 588 झाली आहे.

ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणी ः 86 हजार 118
पॉझिटिव्ह रुग्ण ः 11 हजार 213
प्राप्त तपासणी अहवाल ः 85 हजार 971
प्रलंबित तपासणी अहवाल ः 147|
निगेटिव्ह अहवाल ः 74 हजार 758
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 324
रुग्णालयात दाखल बांधित ः 3 हजार 47
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले ः 7 हजार 842

शहरातील संख्या
एकूण तपासणी ः 63 हजार 576
पॉझिटिव्ह रुग्ण ः 6 हजार 588
प्राप्त तपासणी अहवाल ः 63 हजार 567
प्रलंबित तपासणी अहवाल ः 9
निगेटिव्ह अहवाल ः 56 हजार 979
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 412
रुग्णालयात दाखल बांधित ः 797
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेलेः 5 हजार 379

Related Stories

सोलापुरात कोरोनाचा कहर, जिल्ह्याला जोडणारे 173 लहान व मोठे रस्ते बंद

Archana Banage

राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ

prashant_c

सोलापूर : विजय वडट्टीवार यांच्या पोस्टरला जोडे मारत मराठा समाजाचे आंदोलन

Archana Banage

श्री संगमेश्‍वराच्या सान्निध्यात रंगली विकास आणि भाषेची चर्चा

Archana Banage

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

मोठी ब्रेकींग : करमाळ्यात रेल्वे अपघात; मालगाडी रुळावरून घसरली

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!