Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये ३५७ कोरोनाबाधितांची भर

एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 21, 713 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
6940व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात मंगळवारी 357 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 231 पुरुष, 126 स्त्रियांचा समावेश आहे. आज 15 तर आतापर्यंत 602 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 21 हजार 713 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार940 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2780 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2423 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 257 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 21 हजार 713 रुग्णांपैकी 13 हजार 394 पुरुष, 8 हजार 319 स्त्री आहेत. आतापर्यंत 602 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 14 हजार 171 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट- 845 मंगळवेढा 1005, बार्शी4044, माढा- 2174, माळशिरस – 3379, मोहोळ – 937, उत्तर सोलापूर – 648, करमाळा-1670, सांगोला -1503, पंढरपूर 4307, दक्षिण सोलापूर – 1201, एकूण -21, 713

होम क्वांरटाईन – 5313
एकूण तपासणी व्यक्ती- 164540
प्राप्त अहवाल- 164402
प्रलंबित अहवाल- 138
एकूण निगेटिव्ह – 142690
कोरोनाबाधितांची संख्या- 21, 713
रुग्णालयात दाखल – 6940
आतापर्यंत बरे – 14,171
मृत – 602

Related Stories

सोलापूर ग्रामीण भागात ३७ पॉझिटीव्ह रुग्ण

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात 244 कोरोना पॉझिटिव्ह, 9 मृत्यू

Archana Banage

पंढरपुरात बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब सील

Archana Banage

सोलापूर : विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब : दुकाने बंद, घबराटीचे वातावरण

Archana Banage

उस्मानाबाद : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला

Archana Banage

लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे येणाऱ्यांवर कारवाई होणार – जिल्हाधिकारी जी श्रीकांत

Archana Banage