Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये ४५४ कोरोनाबाधितांची भर

एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २२, १६७ वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
६९४० व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात बुधवारी 454 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 294 पुरुष,155 स्त्रियांचा समावेश आहे. आज 16 तर आतापर्यंत 618 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 22 हजार 167 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3294 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2840 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 454 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 22 हजार 167 रुग्णांपैकी 13 हजार 688 पुरुष, 8 हजार 479 स्त्री आहेत. आतापर्यंत 618 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 14 हजार 575 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट – 845, मंगळवेढा- 1019, बार्शी – 4122, माढा – 2214, माळशिरस – 3529, मोहोळ – 943, उत्तर सोलापूर – 653, करमाळा – 1692, सांगोला – 1555, पंढरपूर – 4382, दक्षिण सोलापूर – 1213, एकूण -22, 167

होम क्वांरटाईन – 5199
एकूण तपासणी व्यक्ती- 167955
प्राप्त अहवाल- 167833
प्रलंबित अहवाल- 122

एकूण निगेटिव्ह – 14566
कोरोनाबाधितांची संख्या- 22, 167
रुग्णालयात दाखल – 6940
आतापर्यंत बरे – 14,575
मृत – 618

Related Stories

रोज फक्त पाच हजार भाविकांनांच मिळणार तुळजाभवानीचे दर्शन

Archana Banage

ऑनलाईन बुकिंगविना आधार कार्ड दाखवत होणार विठोबाचे दर्शन

Archana Banage

सोलापूर शहरात आज नव्याने ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

आ.प्रशांत परिचारकांच्या ‘त्या’ विधानाचा निषेध; माजी सैनिकाने फेकले गाडीवर ऑईल

Abhijeet Khandekar

सातारा : तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

Archana Banage