Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये 214 कोरोना पॉझिटीव्ह तर 9 जणांचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 206 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2213 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 214 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1999 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 214 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 125 पुरुष आणि 89 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10615 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 79937
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 10615
-प्राप्त तपासणी अहवाल : 79835
-प्रलंबित तपासणी अहवाल : 102
-निगेटिव्ह अहवाल : 69220
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 308
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2836
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 7472

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णसंख्येसह, मृत्यूचे प्रमाण वाढतेच

Abhijeet Shinde

पैसे भरुनही नेर धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

Abhijeet Shinde

कोणत्याही प्रकारचे कर्ज हप्ते वसुली केल्यास कारवाई

Abhijeet Shinde

वैराग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा

prashant_c

विवाहित महिलेवर घरात घुसून अतिप्रसंग

Abhijeet Shinde
error: Content is protected !!