Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये 327 रुग्ण कोरोनामुक्त

आज 93 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 29,127 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती
3322व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 327 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज  मंगळवारी 93  कोरोनाबाधित  पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 62 पुरुष, 31 स्त्रियांचा समावेश आहे.  आज 9 तर  आतापर्यंत 842 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 29 हजार 127 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 322 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली. 
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1613 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  1520 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 93 पॉझिटिव्ह आढळल्या आहे .  आतापर्यंत 842  जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 24 हजार 963 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट  –  1060, मंगळवेढा-  1341, बार्शी  5231, माढा  2964, माळशिरस – 5041, मोहोळ 1339, उत्तर सोलापूर – 716, करमाळा-   1999, सांगोला   2327, पंढरपूर   5753, दक्षिण सोलापूर – 1386
एकूण  29, 127

होम क्वांरटाईन – 4158
एकूण तपासणी व्यक्ती-  223894
प्राप्त अहवाल- 223850
प्रलंबित अहवाल- 44
एकूण निगेटिव्ह – 194724
कोरोनाबाधितांची संख्या- 29,127
रुग्णालयात दाखल – 3322
आतापर्यंत बरे – 24,963
मृत – 842

Related Stories

विमा योजना माथी मारू नका

prashant_c

अंगद घुगे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

Archana Banage

नेमका कोणता टप्पा किती तारखेला सुरु होणार याबाबत सोलापूरकरांच्यात संभ्रमावस्था

Archana Banage

वीजबिल वसुली तात्काळ थांबवून वीज जोडणी पूर्ववत करा

Archana Banage

सोलापूर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये १७१ रुग्णांची भर; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर शहरात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

Archana Banage