Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये 549 नवे रुग्ण, 16 जणांचा कोरोनाने मृत्यू

Advertisements

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार
बरे झाल्याने 282 रुग्णांना सोडले घरी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 549 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 282 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 4711 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 549 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 4162 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 549 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 363 पुरुष आणि 186 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16074 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 128356
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 16074
प्राप्त तपासणी अहवाल : 128245
प्रलंबित तपासणी अहवाल : 111
निगेटिव्ह अहवाल : 112170
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 468
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 5110
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 10497

Related Stories

सोलापूर : दुप्पट फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेचार लाखाचा गंडा

Abhijeet Shinde

सोलापूर : जितेंद्र पवार, दत्तात्रय सावंत यांचा स्टिकर लावून १०० मीटरच्या आत केला प्रचार

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील पहिले ‘प्लाझ्मा थेरपी सेंटर’ रत्नागिरीत

Abhijeet Shinde

सोलापूर महापालिकेच्या 7 समित्यांच्या 63 सदस्यांची बिनविरोध निवड

Abhijeet Shinde

जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; दोघांचा बळी

Patil_p

सोलापूर : हे सरकार आंधळे, बहिरे आणि मुके : सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!