Tarun Bharat

सोलापूर ग्रामीण भागात १८ कोरोनाबाधित रुग्णाची भर

सोलापूर /प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  शनिवारी नव्याने 18 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 11 पुरुष, 7 स्त्रिचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 69 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 179 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शनिवारी दिली. 

पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मोहोळ तालुका वाळुज 2, कुरुल क्रांतीनगर  1, होटगी तालुका दक्षिण सोलापूर 1, होटकर गल्ली कारंजा चौक अक्कलकोट 1, गुरववाडी 1, वैराग 2, बार्शी 1, दक्षिण सोलापूर कर्देहळ्ळी 1, नवी विडी घरकुल 1, मुळेगाव पारधी वस्ती 6, तालुका अक्कलकोट करजगी 1  याठिकाणी  पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहे. आज 239 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  18 पॉझिटीव्ह तर 221 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 34  अहवाल प्रलंबित आहेत. 179 रुग्णांपैकी 112 पुरुष 67  स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 69  जण बरे होऊन घरी गेली आहेत. 
 
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट  –  30
बार्शी –       27
माढा-         7
माळशिरस – 5
मोहोळ-       9
उत्तर सोलापूर – 12
सांगोला      –   3
पंढरपूर           7 
दक्षिण सोलापूर – 79
एकूण –         179

होम क्वांरटाईन – 2282
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 2601
प्राप्त अहवाल- 2567
प्रलंबित अहवाल- 34
एकूण निगेटिव्ह – 2389
कोरोनाबाधितांची संख्या- 179
रुग्णालयात दाखल – 99
आतापर्यंत बरे – 69
मृत – 11

Related Stories

कोविडमुळे आई-वडील हिरावलेल्या मुलांना निर्वाह भत्ता सुरू करत मोफत शिक्षण द्या

Archana Banage

मंगळवेढयात बंदला संमिश्र प्रतिसाद

Archana Banage

पुणे : सेंट्रल मॉलच्या पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर

Tousif Mujawar

राज ठाकरेंनी घेतली इतिहास अभ्यासक मेहेंदळेंची भेट

datta jadhav

वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार

Tousif Mujawar

संकटाच्या काळात सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करावे : जयंत पाटील

Tousif Mujawar