Tarun Bharat

सोलापूर ग्रामीण भागात ६ पॉझिटीव्ह रुग्ण

सोलापुर / प्रतिनिधी


सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 6 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 3 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.    

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 119 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 113 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 6 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 3 पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश आहे. आज बुधवार पेठ, अक्कलकोट, वांगी आणि मुळेगाव, ता. द. सोलापुर, बोरगाव आणि सलगर, ता. अक्कलकोट येथे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 265 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 3182
-पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 265
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 14
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 153
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 99
-प्राप्त तपासणी अहवाल : 3182
-प्रलंबित तपासणी अहवाल : 29
-निगेटिव्ह अहवाल : 2888

Related Stories

माणदेशीने उभारला सॉनिटायझेशन टनल

Patil_p

नववर्षानिमित्त साईचरणी धनवर्षा

prashant_c

Archana Banage

मुंबईच्या चाळीपेक्षा शाळेतील कॉरंटाईन परवडले

Patil_p

सातारा जिल्ह्यातील सलून्स,पार्लर सशर्त सुरु

Archana Banage

तीन पानी जुगार खेळणारे सातजण ताब्यात

Patil_p