Tarun Bharat

सोलापूर ग्रामीण भागात 207 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात मंगळवारी 207 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 222 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात  1085 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 207 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 878 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 207  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 118 पुरुष आणि 89 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4301झाली आहे. 

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 31140
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4301
-प्राप्त तपासणी अहवाल : 31020
-प्रलंबित तपासणी अहवाल : 120
-निगेटिव्ह अहवाल : 26720
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 127
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1603
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2571

Related Stories

मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या तीन शतकांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा!

Archana Banage

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक”: प्रताप सरनाईक

Archana Banage

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदाराचा दावा धक्कादायक”

Archana Banage

राजकीय पक्षांचे लक्ष्य ‘युथ ते बुथ’ !

Rahul Gadkar

महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

datta jadhav