Tarun Bharat

सोलापूर ग्रामीण मध्ये आज 31 कोरोनाबाधितांची भर

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  सोमवारी 31 कोरोनाबाधित  पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 17 पुरुष, 14 स्त्रियांचा समावेश आहे. एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 344 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सोमवारी दिली. 

आजचे कोरोनाबाधित रुग्ण माणिक पेठ अक्कलकोट एक,  घाणेगाव तालुका बार्शी एक,  वैराग तालुका बार्शी एक, मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर 6,  बोळकवठा तालुका दक्षिण सोलापूर एक, होटगी स्टेशन तालुका दक्षिण सोलापूर एक , वांगी तालुका दक्षिण सोलापूर 8,  हत्तुर तालुका दक्षिण सोलापूर 7, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर एक,  कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 3,  मार्डी तालुका उत्तर सोलापूर 1 या क्षेत्रात रुग्णआढळले आहेत. 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 112 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  81 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 31 पॉझिटिव्ह आढळल्या आहेत . 344  रुग्णांपैकी 212 पुरुष 132 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 130 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट  –  67
बार्शी –       51
माढा-         8
माळशिरस – 5
मोहोळ-       17
उत्तर सोलापूर – 24
करमाळा-   1
सांगोला      –   3
पंढरपूर           9
दक्षिण सोलापूर – 159
एकूण –         344
होम क्वांरटाईन – 1801


आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 3673
प्राप्त अहवाल- 3644
प्रलंबित अहवाल- 29
एकूण निगेटिव्ह – 3301
कोरोनाबाधितांची संख्या- 344
रुग्णालयात दाखल – 197
आतापर्यंत बरे – 130
मृत – 17

Related Stories

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मक्याचे अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेत होणार वाटप

Abhijeet Shinde

सातारा : वडजलवाडीत गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द

Abhijeet Shinde

सोलापूर विमानतळाजवळ भीषण आग

Abhijeet Shinde

वनविभागाच्या भरारी पथकाचा आंबेदरेत छापा

Patil_p

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू, आणखी इतक्या रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

सातारचा बाल लेखक अथर्वची जागतिक स्तरावर दखल

Patil_p
error: Content is protected !!