Tarun Bharat

सोलापूर : जितेंद्र पवार, दत्तात्रय सावंत यांचा स्टिकर लावून १०० मीटरच्या आत केला प्रचार

Advertisements

दोन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्याची माकपची मागणी
वंचित, माकपचा आक्षेप, सोलापुरात वातावरण तापले
दोन्ही मतदारसंघासाठी जिल्ह्यात चुरशीने मतदान
आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी आज मंगळवारी शहर जिल्ह्यात 197 मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारच्या सत्रात मतदार रांगा लावून मतदानासाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान दुसरीकडे सकाळच्या सत्रात शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथील 100 मीटरच्या आत शिक्षक मतदार संघाचे जितेंद्र पवार, अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या प्रतिनिधीने चक्क त्यांचे स्टिकर लावून प्रचार केला. याला विरोध वंचित बहुजन आघाडी व माकपच्या वतीने करण्यात आला. अखेर जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या मदतीने शंभर मीटरच्या बाहेर या प्रतिनिधींना बसवण्यात आले. या दोन्ही उमेदवार आचारसंहितेचा भंग गुन्हा दाखल करा अशी मागणी माकप, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर शहर जिल्ह्यात शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान शिक्षकचे उमेदवार जितेंद्र पवार यांचे स्टीकर लावून प्रतिनिधींनी प्रचार केला. त्यांचे पाहून अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्या प्रतिनिधींनी चक्क त्यांच्या स्टिकर लावून प्रचार केला. यावेळी हा प्रकाराचा निषेध करीत माकप, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांनी प्रशासनास निदर्शनास आणून देत तक्रार केली. अखेर पोलिसांनी हे स्टॉल काढले आहेत. यामुळे सोलापुरात चांगलेच वातावरण तापले होते.

Related Stories

सोलापूर : तिसऱ्या टप्प्यात 7 लाख जणांना मिळणार लस

Archana Banage

माय-लेकीचा विनयभंग करून मारहाण

Abhijeet Khandekar

नववर्षाच्या पहिल्या दिवशी विठोबाला ब्लू डायमंड फुलांचा साज

Archana Banage

कागदी पिशव्या तयार करण्याचे पाचशे विद्यार्थ्यांना धडे

prashant_c

साडेनऊ हजार कामगारांच्या हाताला काम; जिल्ह्यातील 625 कारखाने सुरु

Archana Banage

सोलापूर शहरात २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!