Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करा, अभविपची निदर्शने

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहर, जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज मंगळवारी शहरातील संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या गेटसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. महाविद्यालय सुरू झालीच पाहिजे, कोण म्हणते सुरू होत नाही, सुरू झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अस कस देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात “जे महाविद्यालय बंद आहेत ते महाविद्यालय उघडा आंदोलन” करत आहे. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाले फक्त वरिष्ठ महाविद्यालय बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाचा आग्रह का आहे? याचा अर्थ असा आहे का, की वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची समज इतरां पेक्षा कमी आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता महाविद्यालय त्वरित सुरु करावीत अन्यथा अभाविप संपूर्ण महाराष्ट्रात याहि पेक्षा तीव्र आंदोलन करेल. आज मंगळवारी संगमेश्वर महाविद्यालयाच्या गेट समोर विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्यांना निवेदन दिले व ते पुढे  राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री, मा. कुलगुरू या सर्वांना विद्यार्थ्यांच्या भावना कळवाव्यात व लवकरात लवकर महाविद्यालय सुरू करावे अश्या आशयाचे  पत्र पाठवावे. या वेळी अनिकेत प्रधाने (महानगरमंत्री)  मकरंद कामूर्ती, यज्ञेश डांगरे (महानगर सहमंत्री)उर्वी पटेल, श्रुती बिराजदर, प्रशांत माळी, आदित्य मुस्के (नगर मंत्री)  मयूर झवेरी, दिनेश मठपती, समर्थ दरेकर, अंजली तानवडे, श्रुष्टी डांगरे व अभाविप कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

Related Stories

आमदार भारत भालके अनंतात विलीन

Archana Banage

जगाच्या पोशिंद्याची जिल्हाधिकार्‍यांच्या हाकेला साद

Archana Banage

पूजाने कृतीतूनच दिला नारी शक्ती संदेश

Archana Banage

जळगाव : डंपर-क्रूझरच्या भीषण अपघातात 10 ठार, 7 जखमी

prashant_c

सोलापूर : वीज बिलासंदर्भात आघाडी सरकारने विश्वासघात केला : आमदार राजेंद्र राऊत

Archana Banage

नान्नजमध्ये शाळकरी मुलाचा खून; पंधराशे रुपयाने केला घात

Archana Banage