Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 31 बळी, शहरात 44 तर ग्रामीण भागात 748 नवे रुग्ण

Advertisements

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर  शहरात सोमवारी 44तर ग्रामीण भागात 748 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 31 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज नवे कोरोनाबाधित 748 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 30 रुग्णांचा मृत्यू तर 2234  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 748  पैकी 408 पुरुष, 340  स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 2453 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 17 हजार 989   कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 13 हजार 052 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली.  जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 4953 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  4205 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर  748 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2453 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 24 हजार 484 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

सोलापूर शहरात  नव्याने 44 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 77  रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने  1रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

सोलापूर शहरात  1857 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 44 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1813 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 44  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 22 पुरुष तर 22 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27  हजार 923  झाली आहे.

Related Stories

सोलापूर : भाजपाच्या उपोषणाचे झाले क्षणिक आंदोलन

Abhijeet Shinde

कामगारांच्या अनुदानासाठी ‘माकप’चे सोलापुरात आंदोलन

Abhijeet Shinde

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा – जिल्हाधिकारी शंभरकर

Abhijeet Shinde

रस्त्यावर ३२ वर्षीय पुरुषाचे गुप्तांग कापले

Sumit Tambekar

सोलापूर : परंडा येथील सराफ अभिजित पेडगावकरवर खंडणीचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

बार्शीत कोरोनाचा दुसरा बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!