Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 13 बळी, 314 नवे रुग्ण

Advertisements

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर  शहरात आज 15 तर ग्रामीण भागात 299 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज नवे कोरोनाबाधित 299 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 11 रुग्णांचा मृत्यू तर 375 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 299  पैकी 169  पुरुष, 130  स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 2886 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 29 हजार 525 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 614 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली.  जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2853 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  2554 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर  299 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2886 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 24 हजार 025 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

सोलापूर शहरात  नव्याने 15 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने  2 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.  सोलापुर शहरात 2062 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2047 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 15 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 11 पुरुष तर 4 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28  हजार 431  झाली आहे.

Related Stories

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यु

Abhijeet Khandekar

उत्तम नागरिक ही भारताची सर्वात मोठी गरज : डॉ.अ.ल. देशमुख

prashant_c

सोलापूर : लवंगी येथे भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून ; वडील बचावले

Abhijeet Shinde

काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे

Abhijeet Shinde

सोलापूर : चाकूचा धाक दाखवून माढयात साडेसात लाखांची चोरी

Abhijeet Shinde

सोशल मिडीयाच्या आहारी जावून खून केल्याची कबुली

Sumit Tambekar
error: Content is protected !!