Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यात दहा दिवसात पाच हजार अँटिजेन टेस्ट करणार : जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / सोलापूर

जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत्या दहा दिवसात पाच हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील अँटिजेन टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या टेस्टमुळे अर्ध्या तासातच कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती कळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात येत्या दहा दिवसात अँटिजेन टेस्टची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

आजपर्यंत अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर येथे या तालुक्यातून टेस्टची सुरुवात करण्यात आली आहे. अँटिजेन टेस्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना बाधा झालेल्या व्यक्तीचे झटपट अलगीकरण करणे, त्यांच्यावर उपचाराची सुरुवात करणे शक्य झाले आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे. अक्कलकोट-90, बार्शी-257, माळशिरस-32, पंढरपूर -161, उत्तर सोलापूर-87,दक्षिण सोलापूर-234.

Related Stories

शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

सोलापूर शहरात 25 कोरोना पॉझिटिव्ह, 4 रुग्णांचा मृत्यू

Archana Banage

मला आरोपी, सहआरोपी बनवता येईल असे प्रश्न विचारण्यात आले

datta jadhav

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणार्‍या दुचाकीचे उत्पादन सुरु करा

Archana Banage

प्रचारात आ. शशिकांत शिंदेचा धडाका

Patil_p

एकनाथ खडसे यांनी घेतली मुंबईत शरद पवारांची भेट

Archana Banage