Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के, शिक्षक मतदारसंघसाठी 85.09 टक्के मतदान

Advertisements

सोलापूर, प्रतिनिधी

विधान परिषदेच्या पुणे पदवीधरच्या 62 व शिक्षक मतदार संघातील 35 उमेदवारांसाठी सोलापूर शहर जिल्ह्यात आज मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. पदवीधरांसाठी 62.7 टक्के तर शिक्षकांसाठी 85.09 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान उद्या 3 डिसेंबर रोजी पुण्यात मतमोजणी होणार आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शहर जिल्ह्यातील 197 मतदान केंद्रावर मतदान उस्फूर्तपणे झाले.   सकाळी आठ वाजल्यापासून  शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी रांगाच रांगा लावल्या होत्या. कोरोनाच्या उपायोजना करीत  प्रत्येक मतदाराचे थर्मल गनद्वारे तापमान तपासणी, सॅनिटायझर देऊन मतदान करण्यासाठी मतदारास प्रवेश देण्यात आला. 

पदवीधर मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्र 123 होती. या निवडणुकीत पुरुष पदवीधर मतदार 42 हजार 70 तर स्त्री पदवीधर मतदार संख्या  11 हजार 742 एवढी आहे.  27 हजार 170 पदवीधर पुरुषांनी तर 6229 एवढ्या महिला पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 33399 मतदारांनी मतदान केले तर 62.7  टक्के मतदान झाले तर शिक्षक मतदारसंघात 74 मतदान केंद्रे असून शिक्षक संख्या 13 हजार एवढी असून  9225  पुरुष शिक्षकांनी मतदारांनी तर 2371 महिला शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 11558 एवढ्या शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी 85.9 टक्के एवढी आहे

Related Stories

गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…

Archana Banage

राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांना पुन्हा ‘ब्रेक’

Archana Banage

सोलापूर : अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांसाठी मनपा राबवणार ‘खावटी अनुदान योजना’

Archana Banage

करमाळा तालुक्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; तहसीलदार समीर माने

Archana Banage

मादक पदार्थ, धुम्रपान विषयक समुपदेशन, जागृती मोहीम

prashant_c

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा

prashant_c
error: Content is protected !!