Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यात सहा हजार बाधित रुग्ण ; 2,810 जण ठणठणीत

बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये सर्वाधिक रुग्ण
आतापर्यंत 377 जणांचा बळी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

शहरात मंगळवारी 153 रुग्ण, तर दोघांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 147 नवे रुग्ण, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. शहर-जिह्यात मिळून 6 हजार 129 रुग्ण झाले आहेत. 2 हजार 810 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

शहारात मंगळवारी 153 रुग्ण आढळले. बरे झाल्याने 59 जणांना घरी सोडण्यात आले, तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. शहरात मंगळवारी 1 हजार 10 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 857 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 153 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 90 पुरुष, तर 63 महिलांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 988 झाली आहे. ग्रामीण भागात मंगळवारी 147 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये 83 पुरुष,  64 महिलांचा समावेश आहे. आज तीन, तर आतापर्यंत 48  जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात एकूण 2 हजार 141 रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.

मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, माळशिरस, माढा तालुक्यात हे रुग्ण आढळले आहेत. आज 1 हजार 606 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1 हजार 459 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 147 पॉझिटिव्ह आढळले आहे. 2 हजार 141 रुग्णांपैकी 1 हजार 324 पुरुष 817 महिला आहेत. आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 619 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट375
मंगळवेढा53
बार्शी 514
माढा- 83
माळशिरस – 93
मोहोळ-       157
उत्तर सोलापूर – 171
करमाळा-   26
सांगोला      –   18
पंढरपूर –          197
दक्षिण सोलापूर – 454
एकूण रुग्ण-         2 हजार 141

होम क्वारंटाईन – 2 हजार 711
आजपर्यंत तपासणी- 16 हजार 204
प्राप्त अहवाल- 16 हजार 120
प्रलंबित अहवाल- 84
एकूण निगेटिव्ह – 13 हजार 980

कोरोनाबाधितांची संख्या- 2141
रुग्णालयात दाखल – 1474
आतापर्यंत बरे – 619
मृत – 48

शहरातील संख्या
-एकूण तपासणी ः 20 हजार 283
-पॉझिटिव्ह रुग्ण ः 3 हजार 988
-प्राप्त तपासणी अहवाल ः 20 हजार 242
-प्रलंबित तपासणी अहवाल ः 41
-निगेटिव्ह अहवाल ः 16 हजार 254
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 329
-रुग्णालयात दाखल असलेले बाधित ः 1 हजार 468
-बरे होऊन घरी गेलेले बाधितः 2 हजार 191

Related Stories

अर्थसंकल्प सादर होताच राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हमीभाव कायदा करा तरच…

Archana Banage

ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका नको: देवेंद्र फडणवीस

Archana Banage

पंढरपुरात उद्यापासून संचारबंदी

Archana Banage

दहावी, बारावीच्या परीक्षा अर्जांना मुदतवाढ

datta jadhav

Solapur : पोलिस यंत्रणेतील आधुनिकता कौतुकास्पद- पालकमंत्री विखे- पाटील

Abhijeet Khandekar

पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar