Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यात ३२५ जणांनी कोरोनाला हरविले

Advertisements

ग्रामीणमध्ये 260, शहरात 34 नवे रुग्ण ः 11 जणांचा मृत्यू, पुरुषांचे प्रमाण अधिक

 तरुण भारत संवाद प्रतिनिधा / सोलापूर

ग्रामीण भागातील 207, तर शहरातील 118 जणांनी एकाच दिवशी कोरोनावर मात केली. दोन्ही मिळून 11 जणांचा मृत्यू झाला असून, ग्रामीणमध्ये 260, तर पालिका हद्दीत 34 नवे रुग्ण आढळून आले. पुरूषांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असल्याच्या आजच्या अहवालावरुन समोर आले आहे.

ग्रामीण भागात सोमवारी 260 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 207 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 9 हजार 716 वर पोहोचल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. 932 जणांपैकी 260 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 672  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात 167 पुरुष आणि 93 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 716  झाली आहे. शहारात नव्याने 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 118 जणांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 374 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये 21 पुरुष, तर 13 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 343 झाली आहे.

ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणी ः 74 हजार 32
पॉझिटिव्ह रुग्ण ः 9 हजार 716
प्राप्त तपासणी अहवाल ः 73 हजार 892
प्रलंबित तपासणी अहवाल ः 140
निगेटिव्ह अहवाल ः 64 हजार 177
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 275
रुग्णालयात दाखल बांधित ः 2 हजार 597
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले ः 6 हजार 844

शहरातील संख्या
एकूण तपासणी ः 56 हजार 787
पॉझिटिव्ह रुग्ण ः 6 हजार 343
प्राप्त तपासणी अहवाल ः 56 हजार 752
प्रलंबित तपासणी अहवाल ः 35
निगेटिव्ह अहवाल ः 50 हजार 409
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 401
ग्णालयात दाखल बांधित ः 1 हजार 86
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेलेः 4 हजार 856

Related Stories

करमाळा व जेऊर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन लाईनचे काम तातडीने होणार

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात २८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

विद्यापीठात सरकारपुरस्कृत हिंसाचार

prashant_c

सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून 339 लसीकरण केंद्राचे नियोजन

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीनजीक बस पेटवल्याप्रकरणी चौघे अटकेत

Abhijeet Shinde

वैराग ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकला; नगरविकास विभागाची निवडणूक आयोगाला मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!