Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा ; 283 जण कोरोनामुक्त

नव्याने 154 रुग्णांची भर, ग्रामीणमध्ये दहा जणांचा बळी

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने दिलासा मिळत असून, रविवारी 283 जण कोरोनामुक्त झाले. नव्याने 154 रुग्णांची भर पडली असून, ग्रामीणमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात एकाच दिवशी 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले. नव्याने 120 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, यापैकी 74 पुरुष, 46 महिलांचा समावेश आहे. 3 हजार 679 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 1 हजार 399 जणांच्या अहवालामध्ये 1 हजार 279 जण निगेटिव्ह, तर 120 जण पॉझिटिव्ह आढळल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले. शहारात नव्याने 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 31 जणांना घरी सोडण्यात आले. 320 जणांच्या अहवालामध्ये 34 जण पॉझिटिव्ह, तर 286 जण निगेटिव्ह आले. 34 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 23 पुरुष, तर 11 महिलांचा समावेश असल्याचे माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

ग्रामीणमधील संख्या
होम क्वारंटाईन – 4,065
एकूण तपासणी – 2,21,230
प्राप्त अहवाल- 2,21,194
प्रलंबित अहवाल- 36
एकूण निगेटिव्ह – 1,92,272
कोरोनाबाधितांची संख्या- 28,923
रुग्णालयात दाखल – 3,679
आतापर्यंत बरे – 24,421
मृत – 823

शहरातील संख्या
एकूण तपासणी : 87,803
पॉझिटिव्ह रुग्ण : 9,258
प्राप्त तपासणी अहवाल : 87,803
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 78,545
एकूण मृत : 513
रुग्णालयात दाखल : 674
बरे झालेले : 8,071

Related Stories

बार्शीतील कासारी येथे रेशन मोफत धान्य वाटले नसल्याची तक्रार

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात ११ जण कोरोना बाधित

Archana Banage

बार्शीत कोरोनाची स्फोटक परिस्थिती – प्रांताधिकारी निकम

Archana Banage

साई जन्मभूमी वाद चिघळणार

prashant_c

सोलापूर विद्यापीठ कार्यशाळेत राज्यपाल, मंत्री गडकरी सहभागी होणार

Archana Banage

अक्कलकोटमध्ये विवाहितेचा पतीनेच केला गळा दाबून खून

Archana Banage
error: Content is protected !!