Tarun Bharat

सोलापूर : जीवनावश्यक वस्तू, खाद्य तेल, इंधन दरवाढ व महागाई विरुद्ध माकप आक्रमक

महागाईचा महाराक्षक गाडून टाका, कॉ. नरसय्या आडम

प्रतिनिधी / सोलापूर

केंद्र सरकार सत्तेत येऊन तब्बल आठ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या आठ वर्षात देशाच्या विकासाचा आलेख ऊर्ध्व ऐवजी अधोगतीकडे झुकत असताना सर्वसामान्यांची प्रश्न आणखी जटील व गुंतागुंतीचे बनत आहेत. जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल, इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडणारी महागाई अनियंत्रितपणे वाढत चाललेली आहे. या महागाईच्या महाराक्षसामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे.
म्हणून महागाईचा महाराक्षस गाडून टाकला पाहिजे. यासाठी जनता या कोरोना प्रादुर्भावाच्या महामारीत सुद्धा जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

गुरुवार दि. १७ जून २०२१ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्यावतीने देशव्यापी महागाई विरुद्ध जन आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने माकपाचे केंद्रीय समिती सदस्य तथा महाराष्ट्र राज्य सचिव माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व जिल्हा सचिव अॅड. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे सकाळी ११ धरणे आंदोलन करण्यात आले.

सकाळी ११ च्या दरम्यान माकपाचे सर्व कार्यकर्ते व आंदोलक पूनम गेट येथे जमा व्हायला सुरुवात झाली. लाल झेंडे, निषेध व मागण्यांचे फलक आणि महागाईचा महाराक्षक प्रतिकात्मक बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन ठिकाणी कॉ.आडम मास्तर येताच पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. बळजबरीने महिला कार्यकर्ते व आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली. यावेळी कॉ. नरसय्या आडम यांच्यासह शेकडो आंदोलकांना सदर बझार पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी ताब्यात घेतले. नियोजित शिष्टमंडळाला जबरदस्तीने ताब्यात घेतले.

तद्नंतर यावेळी मा. जिल्हाधिकारी यांना अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, वीरेंद्र पद्मा, असिफ पठाण, इलियास सिद्धिकी, शाम आडम, विजय हरसुरे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.यावेळी नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, शेवंताताई देशमुख आदी मान्यवर उपस्थिती होते.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच

Archana Banage

तामजाईनगर येथे भारतीय बैल बेडकाचे दर्शन

Patil_p

अदर पूनावाला भारतात परतले

Archana Banage

वीज पडून दोघांचा मृत्यू

Patil_p

सोलापूर जिल्ह्यात 20 मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल

Archana Banage

राज्यातील खासदारांना घेऊन राष्ट्रपतींना भेटणार – खा. संजयकाका पाटील

Archana Banage