Tarun Bharat

सोलापूर : डान्सबारवर छापा, बार मालकासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श नगरातील नयन हाॅटेलमध्ये विनापरवाना नृत्य करणाऱ्या तीन मुलींना ताब्यात घेतले असून अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला.

रविवारी मध्यरात्री हॉटेलमध्ये तीन नृत्यांगना अश्लील हावभाव करत असताना आढळून आल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हॉटेल मालकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एकूण २ चारचाकी आणि २ दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

Related Stories

लॉकडाऊन काळातील वीज बिलांची भाजपच्यावतीने होळी

Archana Banage

सोलापूर: “लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे”, उपमुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागात 1 कोरोनाबाधित रुग्णाची भर

Archana Banage

कुकडी भूसंपादनासाठी 13 कोटी 50 लाख तर सीना माढासाठी 16 कोटी 65 लाख निधी प्राप्त

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शेंडा पार्कात १८ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

Archana Banage

कोंबडीचोर मित्रांकडून पोल्ट्रीचालकाची फसवणूक

Archana Banage