Tarun Bharat

सोलापूर : दर निश्चितीच्या विरोधात डॉक्टरांकडून ‘मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन’च्या प्रतिकृतींची होळी

‘आयएमए’चा विरोध; वेळ पडल्यास सेल्फ क्वारंटाईन होणार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

शासनाने कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराचे दर ठरवून दिले आहेत. उपचाराचे दर ठरविण्याआधी शासनाने डॉक्टरांशी चर्चा करायला हवी होती. एका बाजूने विचार करुन हे दरपत्रक ठरविल्याने डॉक्टरांमध्ये नाराजी आहे. परिणामी याला विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने मेडिकल काऊन्सिलच्या रजिस्ट्रेशनची होळी करत याला विरोध दर्शविला.

आयएमएच्या डफरिन चौक येथील कार्यालयासमोर शुक्रवारी सदरचे आंदोलन करण्यात आले. रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने दर ठरवून दिले आहेत. या ठरवलेल्या दराचा रुग्णालयांना आर्थिक फटका बसू शकतो. शासनाने याबाबत विचार न करता निर्णय घेतला आहे. राज्य आयएमएच्या निर्देशानुसार सोलापुरातही सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मेडिकल काऊन्सिलच्या रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृती व शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित डॉक्टरांनी दिवंगत झालेल्या कोरोना योद्धयांना श्रद्धांजली वाहिली.

गरज पडल्यास सेल्फ क्वारंटाईन होणार
आयसीयूसाठी ठरवलेल्या दरांमध्ये ऑक्सिजन, पीपीई किट्स, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, कर्मचार्‍यांचे पगार, निजंर्तुकीकरणाचा खर्च भागवणे रुग्णालयांसाठी अवघड होत आहे. छोटी रुग्णालये आणखी आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. गरज पडल्यास सेल्फ क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे आयएमकडून सांगण्यात आले.

Related Stories

यंदा इसबावी ते पंढरपूर प्रातिनिधीक पायी वारीला परवानगी

Archana Banage

प्रभागरचना तयार करताना राजकीय हस्तक्षेप; निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

Abhijeet Khandekar

फिरायला गेलेल्या इसमाचा अज्ञात कारणामुळे मृत्यू

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागातील निर्बंधांना आजपासून पुन्हा मुदतवाढ

Archana Banage

कर्जबाजारीपणामुळे पोलीस हवालदाराची गळफासाने आत्महत्या

Archana Banage

सोलापूर : पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

Archana Banage
error: Content is protected !!