Tarun Bharat

सोलापूर : दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन

पंढरपूर / प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.

पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते किडनीच्या आजारापासून त्रस्त होते.

मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये पाटील यांचे मोठे योगदान होते. कारखान्याचे संचालक व्हा चेअरमन , चेअरमन असे विविध पदांवर त्यांनी काम केले. त्याचबरोबर भीमा सहकारी साखर कारखान्यावर देखील त्यांनी यापूर्वी काम पाहिले. सहकार क्षेत्रातील योगदानामुळे तालुक्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र त्यांनी स्वतःकडे खेचून आणले.

चरणुकाका पाटील यांच्या पश्चात मुलगा मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Stories

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त व नियोजन बद्ध शेती करावी – डॉ. कसपटे

Archana Banage

पूजाने कृतीतूनच दिला नारी शक्ती संदेश

Archana Banage

यंदाचा अर्थसंकल्प उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ऐतिहासिक : खा. ओमराजे निंबाळकर

Archana Banage

अशा ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात नवे ३३ कोरोना बाधित

Archana Banage

कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारीपासून नियमित

prashant_c