Tarun Bharat

सोलापूर : दिवाळीपर्यंत विकास कामाचा अनुशेष भरून काढू : आ. कल्याणशेट्टी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी /अक्कलकोट:

गेल्या अनेक वर्षांपासून बोरगावसह पंचक्रोशीतील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत.मूलभूत सुविधांचा अनुशेष दिवाळीपर्यंत भरून काढणार आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत मागच्या अर्थ संकल्पात जवळपास ९ कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले आहे. मी खोटी अश्वासन देणाऱ्यांपैकी नसून कामे करून दाखवत असतो असे प्रतिपादन अक्कलकोट तालुक्यातील आमदार सचिन कल्याणशेट्टी केले.

बोरगाव दे येथे २५ / १५ योजनेतून पिर हुसेनबाशा व बाराइमाम देवस्थान येथे सभागृह बांधणेसाठी आठ लाख रुपये मंजूर झाले असून या विकासकामाचे भूमिपूजन समारंभ कार्यक्रम वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच चनप्पा कामशेट्टी हे होते. तद नंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. व्यासपीठावर प्रदीप जगताप, विरोधीपक्ष नेते पंस अक्कलकोट गुंडप्पा पोमाजी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदीछोडे, श्रीशैल ठोंबरे, भाजपा सरचिटणीस अक्कलकोट प्रदीप पाटील, कमलाकर सोनकांबळे, शंकर उणदे, सचिन घुगरे, सुभाष किवडे, सुरेश कोतले, शाम स्वामी, संतोष पोमाजी, राज यादव, बसवराज कलशेट्टी, शंकर गुमते, शशिकांत कोळी, कांतू धनशेट्टी उपस्थित होते.

पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की, तुम्ही मला भरगोस मताधिक्याने निवडून दिला आहात मी तुम्हांला शेवटपर्यंत विसरणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणीमोड ते घोळसगांव मुख्य रस्त्यासाठी ६ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले असून दिवाळीनंतर सर्वच कामांना सुरुवात होणार असून मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सतत पाठपुरावा सूरु आहे.

यावेळी कै.बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठानच्या वतीने बोरगावच्या २५ भूमीपुत्रांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मकबूल मुजावर,मौलाली पठाण,मल्लिकार्जुन फुलारी, सिद्धाराम किवडे, दत्तात्रय जिरगे,गंगाधर बंदीछोडे, वीरभद्र स्वामी, महादेव बा. जिरगे,नवाज पठाण, अशोक जिरगे,गुंडप्पा गावडे,शरणप्पा कल्याणी,सतीश गुरव, परमेश्वर मठदेवरू, तुकाराम बिराजदार, सातप्पा घोडके,विठ्ठल वाघमारे, परमेश्वर देडे, राजेंद्र कोळी, शरणप्पा जिरगे,सत्तार मुजावर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार मौलाली पठाण यांनी मानले तर सूत्रसंचालन पांडुरंग पवार यांनी केले.

Related Stories

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले

Archana Banage

सोलापूर : बार्शी आणि वैरागमध्ये लॉकडाऊन

Archana Banage

देवदर्शनाला निघालेली ट्रॅव्हल्स पलटी; 28 भाविक जखमी, एकाचा मृत्यू

datta jadhav

सोलापूर : मांगीजवळ मोटरसायकलच्या अपघातात दोघे ठार

Archana Banage

परागीभवनाचे नैसर्गिक चक्र खंडीत झाल्याने शेतकऱयांच्या आत्महत्यांमध्ये वाढ

prashant_c

Solapur : करमाळ्याची वरदायिनी जगदंबा श्री कमलाभवानी

Abhijeet Khandekar