Tarun Bharat

सोलापूर : पंढरपूरसह 4 तालुक्यातील संचारबंदी उठवली

दुकाने सहा वाजेपर्यंत उघडणार

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूरची वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता. पंढरपूर सांगोला, माढा, माळशिरस आणि करमाळा अशा पाच तालुक्यांमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदी होती. अर्थात सर्व दुकाने आस्थापना उघडण्याची मुभा होती. मात्र रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनाकडून आता सहा वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची अधिसूचना जारी करण्याच्या सूचना प्रशासनास दिले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटनास पालकमंत्री भरणे आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तसेच आमदार बबनदादा शिंदे, नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप गेले प्रांतअधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरणे यांनी बोलताना सांगितले की, पंढरपूर व आसपासच्या चार तालुक्यात मधील रुग्ण संख्या कमी होत आहे. पंढरपुरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या अजूनही थोड्या प्रमाणात आहे. अशातच आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनास पंढरपूर व चार तालुक्यातील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत नव्हे तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडण्यासाठी मुभा द्यावी. अशा सूचना केल्या आहेत. पुढील आठवड्यामध्ये रुग्ण संख्या कमी झाल्यास दुकाने उघडण्याची मुभा रात्री नऊ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पुर्ववत होणार असल्याची माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली. त्यामुळे निश्चितच पंढरपूर ,सांगोला ,माढा, माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील दुकाने येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुली राहू शकतात.

Related Stories

सोलापूर शहरात नवे 46 कोरोना रुग्ण

Archana Banage

सोलापूर : कुर्डुवाडी – भिगवण विद्युतीकरण मार्गाला मिळाला हिरवा कंदील

Archana Banage

बार्शी व वैराग येथील जनावरांचे बाजार सुरु

Archana Banage

कर्नाटक एसटीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Archana Banage

आषाढी वारी नसली तरी फेसबुकवर ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये ६०१ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage