Tarun Bharat

सोलापूर : परराज्यातील तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी/सोलापूर

गेल्या सहा महिन्यापासून सैफूल येथे राहत असलेला आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चन्नपागारीपल्ली या गावतील माडीचरय्यू नायडू (वय १९) या प्रशिक्षणार्थीचे शुक्रवारी पोट दुखीमुळे सिव्हिल हाँस्पिटल येथे दाखल झाले. उपचारा दरम्यान त्याचा सकाळी मृत्यू झाल्याची माहिती सिव्हिल पोलीस चौकीचे मोहन काळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्लेज इंडिया कंपनीच्या तीन महिन्याच्या प्रशिक्षणानिमित्ताने गेली तीन महिन्यापासून सैफूल येथील ओम गर्जना चौक येथे राहत होता. दरम्यान लाँकडाउमध्ये कंपनी बंद पडली पण गावी न जाता न आपल्या सहकार्यांसोबत भाडेतत्वाच्या खोलीतच राहत होते. शुक्रवारी पहाटे ४ वाजता पोटात खूप दुखू लागल्याने ते थेट पोलीस चौकी गाठले. पोलिसांनी त्यांना रिक्षा करून सिव्हिलमध्ये पाठविले. दरम्यान त्या तरुणावर उपचार सुरू त्याचे सकाळी ७ वाजता निधन झाले. याबाबत त्याच्या परिवाराला कळविण्यात आले. राञी उशिरा मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यात आला.

Related Stories

धक्कादायक!बनावट दागिने देऊन राष्ट्रीय बँकेसह पतसंस्थेचे फसवणूक

Rahul Gadkar

सेनेकडे खडसेंना देण्यासारखं आहे तरी काय? : चंद्रकांत पाटील

prashant_c

आरक्षण संपुष्टात आणणे हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव – नाना पटोले

Archana Banage

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c

सोलापूर : श्री तुळजाभवानी मंदिरातील लक्ष्मी नरसिंह मंदिरात जयंती संपन्न

Archana Banage

सोलापूर शहरात नव्याने २९ पॉझिटीव्ह

Archana Banage