Tarun Bharat

सोलापूर : प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा 6 नोव्हेंबरपासून सुरू

प्रतिनिधी / सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.

यासंदर्भात परीक्षा विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासंदर्भाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रथम वर्ष बॅकलॉगच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा तसेच विधी अभ्यासक्रमाच्या एलएलबी सत्र 1 व 2, बी ए एल एल बी सत्र 1 ते 6 तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमात एफई व एसई (CBCS) भाग 1 व 2, टीई (CGPA) भाग 1 व 2 च्या तसेच बीटेक व आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सत्र 1 ते 6 च्या परीक्षा या दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजीपासून सुरू न होता, त्या दि. 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होतील, याची सर्वानी नोंद घ्यावी.

ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पोर्टलवरून ही परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : अरण्यऋषी चितमपल्ली

Archana Banage

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील २८ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

prashant_c

१२ ब्रास वाळुसह ३० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

सोलापूर : परराज्यातील तरुणाचा मृत्यू

Archana Banage

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा – आ. राणाजगजितसिंह पाटील

Archana Banage

मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त एक असा ही आदर्श उपक्रम

Archana Banage