Tarun Bharat

सोलापूर : प्रियसीच्या ञासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/माळशिरस

नातेपुते ता.माळशिरस येथील एका तरुणाने तरुणीच्या प्रेम प्रकरणातून तिच्या ञासास कंटाळून नीरा कालव्यामध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन मधुकर पाडळकर (वय-38) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नांव आहे .याबाबत माळशिरस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सचिन हा या पूर्वी आपल्या कुटुंबा समवेत अहमदनगर येथे राहत होता. त्याचे वडिल एका कंपनी मध्ये नोकरी करीत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सचिन हा त्यांच्या जागेवर नोकरी करू लागला. नोकरी करीत असताना त्याची ओळख त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीशी व तिच्या भावाशी झाली. ते सर्वजण मार्केटिंगचे काम करीत होते.

सचिनला नोकरी लागल्यानंतर संबंधित तरुणी चार ते पाच वर्षानी त्याच्याकडे पैसे मागत होती, तू पैसे न दिल्यास बलात्काराची केस दाखल करीन अशी धमकी देत होती.त्याने अडीच लाख रूपये देऊन सुद्धा तिचा पैशाचा तगादा सुरु राहिल्याने सचिन याने झोपीच्या गोळया खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सचिन याने मार्केटिंगचे काम बंद केल्यानंतर तो आई व बहिणीसह गेल्या चार वषीपूवी नातेपुते येथे राहण्यास आला होता व त्याने साडीचे दुकान टाकून कुटुंबाचा गाडा चालवीत होता.

१२जुलै रोजी सचिन हा जागरणाच्या कार्यक्रमाला जातो असे सांगून घरातून गेला तो आलाच नाही . तो राञभर घरी न आल्याने त्याच्या आईने सर्वञ चौकशी केली परंतु त्याचा कोठेच शोध न लागल्याने १३ जुलै रोजी नातेपुते पोलिसात मिसींग तक्रार नोंदविली.त्यानंतर शेजाऱ्याने चांदापुरी येथे कॅनॉल मध्ये एक पुरूष जातीचे प्रेत आढळले आहे असे सांगितले. हा मृतदेह सचिनचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मृतदेहा जवळ मोबाईल व काही चिठ्ठ्या मिळाल्या त्यामध्येत्याने मी प्रियसी व तिचा भाऊ यांच्या ञासास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

शेतकरी हिताचे कृषी सुधारणा विधेयक लवकरच

Archana Banage

चिंताजनक! जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर

Archana Banage

”राजकारणाच्या पलीकडे लसीकरणाची मोहीम राबवायला हवी”

Archana Banage

पूरग्रस्त कोणीही वंचित राहणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

देशातील सर्व भागात पोहचणार कोरोना टेस्टिंग किट, भारतीय पोस्ट व आयसीएमआर यांच्यात करार

Tousif Mujawar

सांगली जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज; दोघांवर गुन्हा

Abhijeet Khandekar