Tarun Bharat

सोलापूर : बोगस डॉक्टरने घरोघरी पोहोचवला कोरोना, बार्शीत गुन्हा दाखल

प्रतिनिधी / बार्शी

कोरोनाच्या संकटामध्ये डॉक्टर हा घटक समाजासाठी वरदान ठरत असताना बार्शी तालुक्यातील काही गावात आणि बार्शी शहरातील काही भागांमध्ये कोरोना विषाणू हा घरोघरी जणू प्रसाद वाटला की काय, अशाीरितीने एका डॉक्टरने कोरोनाचा विषाणू घरोघरी पोहोचवला आहे आणि मुळात तो डॉक्टर हा बोगस आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन औषध देणे आणि इंजेक्शन देणे हा त्याचा व्यवसाय असून या आधीही बार्शीतील दुसरा रुग्ण जामगाव याठिकाणी सापडला होता त्याला सुद्धा याच बोगस डॉक्टरने उपचार दिला होता.

आता जामगाव कुसळम आणि बार्शीच्या काही भागातील रुग्ण संख्या पाहिली तर ह्या बोगस डॉक्टरांच्या संपर्कातील आहे. दोन महिन्यापूर्वीच त्याला अटकाव करायला हवा होता मात्र काही बड्या मंडळी यांनी त्यास पाठीशी घातले आणि आज बार्शी तालुक्यातील आणि शहरातील वाढणारे रुग्णसंख्या पाहता बार्शी तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बोगस डॉक्टरवर अखेर दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. या भोंदूवर यापुर्वीच कारवाई झाली असती तर काही गावांमध्ये आता अकस्मात जी रुग्णवाढ झाली आहे, ती झाली नसती. त्यामुळे या भोंदूला वारंवार पाठीशी घालणार्‍यावर वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

श्रीमंत हरिश्चंद्र खंडागळे (रा. राऊत चाळ ता. बार्शी) असे या भोंदू डॉक्टरचे नाव असून त्यास आता क्वारंन्टाईन करण्यात आलं आहे. त्याने अनेक गावांमध्ये फिरुन घरोघरी जावून कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ऍलोपॅथीची औषधे, इंजेक्शन, सलाईन दिल्याचे उघडकीस आले आहे. या भोंदू डॉक्टरने उपचारात वेळ घालविल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात पहिला कोरोनाबळी गेला होता. त्याचवेळी याचे कारनामे उघड झाले होते. कसल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण झालेले नसतानाही केवळ राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्तामुळे हा भोंदू परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्यांवर उपचार करत होता.

Related Stories

मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान : आदित्य ठाकरे

datta jadhav

Sanjay Raut: संजय राऊतांनी केलं शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक; म्हणाले,मी ईडीवर टीका करणार नाही

Archana Banage

नात्याला काळीमा फासणारी घटना! सख्ख्या काकानेच केला 2 अल्पवयीन पुतणींवर बलात्कार

datta jadhav

राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये- चंद्रशेखर बावनकुळे

Archana Banage

राम मंदिर बांधल्याने कोरोना बरा होणार का? : शरद पवार

Archana Banage

अजित पवारांकडून पहाटे सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

Tousif Mujawar