Tarun Bharat

सोलापूर : भाजपाच्या उपोषणाचे झाले क्षणिक आंदोलन

तरूण भारत संवाद संकेत कुलकर्णी / पंढरपूर

पंढरीचे विठठल मंदिर उघडावे. यासाठी भाजपाने येथील नामदेव पायरीजवळ लाक्षणिक उपोषण योजिले होते. मात्र कार्यकर्त्यांची वानवा… भाजपा पुरस्कृत आमदारांनी, नगरसेवकांनी फिरवलेली पाठ पाहता. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांचे लाक्षणिक उपोषण केवळ क्षणिक आंदोलनापुरते मर्यादीत ठरले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. प्रारंभी आ. प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल. असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याच उपस्थितीत आंदोलन घडले. विशेष म्हणजे सदरच्या आंदोलनात शहरातील भाजपाचे कार्यकर्ते देखिल अनुपस्थित होते. केवळ परिचारक गटांचे काही नगरसेवक हजेरी लावण्यापुरते आले.तर सरतेशेवटी प्रणव परिचारक यांनी आंदोलनास भेट दिली.

भाजपाचे आंदोलन नामदेव पायरीजवळ घडणार होते. मात्र संबधित आंदोलन हे महाव्दार चौकांच्या पुढे करा. मंदिराजवळ नाही. असे पोलिसांनी भाजपा पदाधिकारी यांना सुचित केले. मात्र भाजपा पदाधिका-यांनी पोलिसासमोर डायलॉगबाजी आणि अरेरावी करीत. नामदेव पायरीजवळच काही मिनिटासाठी फोटोपुरते क्षणिक आंदोलन केले. विशेष म्हणजे भाजपाने आंदोलनावेळी वापरलेल्या फलकावर लाक्षणिक उपोषण असे नमूद करण्यात आले होते. मात्र उपोषणाचे केवळ क्षणिक आंदोलन झाले. त्यामुळे एकादशी दिवशी आलेल्या वारक-यासमोर भाजपाचा फज्जा उडाला.

Related Stories

चळे येथील बालविवाह पोलिसांनी रोखला

Archana Banage

सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत ३५० कोटी खर्चूनही निराशाच

Archana Banage

वेळापूर जवळ भीषण अपघातात 6 जण ठार

Archana Banage

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षासह तिघाजणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

सोलापूर : बार्शी शहरासाठी राबवणार ‘वैराग पॅटर्न’ : प्रांताधिकारी निकम

Archana Banage

थकीत ऊस बिल न दिल्याने जयहिंद शुगरच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Archana Banage